सोमय्याच नाही तर भाजपच्या २८ जणांचे रहस्य खुले करणार- राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांचे आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता सोमय्याच  नाही तर भाजपच्या २८ जणांचे रहस्य खुले करणार असल्याचा खळबळजनक वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर इडीच्या चौकशीत असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये निधीपोटी सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानकडे आले आहेत. भाजपा भ्रष्टाचारावर लढा कसा देत आहे हे या निधीवरून दिसून आले आहे.
किरीट सोमय्या हे हिमनगाचे एक टोक असून आता भाजपच्या २८ नेत्यांचे प्रकरण काढणार आहे. इडीशी संबधित सर्वच चौकशी होणार, जसे नबाब मलिक यांची केली जात आहे, आम्ही पण सामोरे गेलो आहेत, तसे हे इडीशी संबंधातून या २८ जणांची पण एकेक चौकशी होणार, असे संजय राऊत यांनी वक्त्यव्य केले असून ते भाजपचे २८ जण कोण? याबाबत चर्चा रंगत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!