पाण्याच्या चारीत पडल्याने वयोवृध्द महिलेचा मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील शेतातील बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत पडुन एका वयोवृद्ध महिलेच्या दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली सविस्तर माहीती अशी की लिलाबाई रामकृष्ण चौधरी, (वय-७५) राहणार अट्रावल तालुका यावल या काल पासुनआपल्या शेतात जावुन येथे असे सांगुन दिनांक १oमे रोजी आपल्या घरून निघाल्या. परंतू त्या उशीरा पर्यंत घरी न आल्याने अट्रावल गावातील पोलीस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रविन्द्र चौधरी, अभय महाजन व काही ग्रामस्थांच्या मदतीने लिलाबाई यांचा शोध करण्यात आली असता आज दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता त्या अट्रावल शिवारातील देशमुखीतील नामदेव धनजी ढाके यांच्या शेताजवळच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत त्या मृत अवस्थेत आढळुन आल्यात त्या वयोवृद्ध असल्याने पाण्याच्या चारीत कोसळुन त्यांचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मयताचे नातु परेश चौधरी यांनी खबर दिल्याने आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत लिलाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. बी. बारेला व वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!