अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

अमळनेर प्रतिनिधी । येथील मंगळग्रह मंदिरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला. यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

सोमवारी मंगळ ग्रह मंदिरावर आयोजित मेळाव्याप्रसंगी मंचावर पक्षाचे नेते अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोतमा पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, माजी नगरसेवक प्रा. अशोक पवार, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस रिता बाविस्कर, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, प्रा. रंजना देशमुख, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील आदी विराजमान होते.

याप्रसंगी अनिल भाईदास पाटील म्हणाले की, येथील जागा काँग्रेसला सुटली तरी आपण जोमाने लढू, केवळ जिंकणे हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनिल पाटील यांनी आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावण्याचे संकेत दिले.

Protected Content