मुंबई वृत्तसंस्था | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा जीवानिशी संपविण्याची धमकी देणारं पत्र आलं असून धमकी देणारा नौदल अधिकारी असल्याचा दावा केला आहे.
या पत्रात समीर वानखेडेंची माफी मागितली नाही तर घरावर हल्ला करण्याचा इशारा देत मलिक यांना जीवानिशी संपविण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर पत्र लिहिणाऱ्याने आपण एक नौदल अधिकारी असल्याचा दावा केला असून याविषयी नवाब मलिक गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार आहेत.