के.सी.ई.अभियांत्रिकीमध्ये ‘ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट आणि कोविड -१९ क्राइसिस’ या विषयावर व्याख्यान

जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील के.सी.ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बि.ए. विभागात ‘ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट आणि कोविड -१९ क्राइसिस’ या विषयावर प्रा.डॉ.पराग नारखेडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.

प्रा.डॉ.पराग नारखेडे हे आय.एम.आर. महाविद्यालयात व्यवस्थापन विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ नारखेडे यांनी मानव संसाधन व्यवस्थापन व विकाससाठी कोविड -१९ दरम्यान आलेल्या परिस्थितीला कशाप्रकारे हाताळले व त्यावर योग्य मार्ग काढला या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कर्मचारी प्रतिबद्धता, सकारात्मक दृष्टीकोन, प्रशिक्षण आणि विकास, संशोधन व विकास या ‘एच.आर.एम.’ या विभागातील आव्हानात्मक विषयावर मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या कार्याचे व्यवस्थित नियोजन करणे या महत्वपूर्ण विषयावर उपयोगी असा होता. सर्व विद्यार्थी व प्राध्यापक ह्यांनी डॉ नारखेडे ह्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान अत्यंत लाभदायक ठरले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. दिगंबर सोनवणे ह्यांनी प्रयत्न केले , सूत्र संचालन प्रा. सिमरन कौर आणि आभार प्रदर्शन प्रा. प्राची ओझा ह्यानी केले. ह्या वेळी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा हर्षा देशमुख व सर्व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी व उप प्राचार्य संजय दहाड ह्यांनी सर्वांचे अभिनदन केले.

Protected Content