Home Uncategorized उल्हासनगर : नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ; एक ठार, ७ जखमी

उल्हासनगर : नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ; एक ठार, ७ जखमी


उल्हासनगर (वृत्तसंस्था) येथील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये आज दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट zझाला. यात दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला. तर असून ११ जण जखमी झाले आहेत.

 

कॅम्प नं-४ ओ टी सेक्शनमधील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली. या आगीत दुकानदार पप्पू गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजापती व मगरू सोणकर असे ७ जण जखमी झाले आहेत. या आगीत नाष्ट्या चे दुकान जाळून खाक झाले. तसेच शेजारी दुकानांनी आगीची झळ पोहचली आहे. दुकानातून दोन सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या आगीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.


Protected Content

Play sound