उंटावद सहकारी सोसायटी- चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध होवून चेअरमनपदी शशिकांत पाटील यांची पुनश्च वर्णी लागली असून व्हाईस चेअरमनपदी अरुण दयाराम सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

 

विविध कार्यकारी सोसायटीची सोसायटीच्या संचालकपदी यापूर्वी दिलीप यशवंत पाटील,साहेबराव महारू पाटील,विवेक गणपत पाटील,त्र्यंबक जयराम पाटील,जगदीश भाऊराव पाटील,विकास राजधर पाटील,मुरलीधर सुधाकर पाटील, रेशमाबाई एकनाथ पाटील,मिनाबाई शांताराम पाटील,अशोक पितांबर महाजन,किशोर कडू सपकाळे यांची बिनविरोध निवड झाली होती. उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने बिनविरोध निवडणूकीसह चेअरमन व व्हा.चेअरमन याच्या बिनविरोध निवडीची आपली ही परंपरा कायम राखली आहे. चेअरमन शशीकांत पाटील व व्हाईस चेअरमन अरूण सोनवणेसह सर्व संचालकांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विनोद पाटील, सतिष पाटील , तुषार चौधरी, सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील यांनी सत्कार करत अभिनंदन केले. या निवडणूकीच्या प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल) चे डी.जे.तडवी यांनी कामकाज पाहीले तर वसुली अधिकारी ए. टी. तायडे व सेवानिवृत्त सचिव तोताराम सुपडू भारंबे, सचिव संजय दिनकर महाजन, शिपाई भिकन बळवंत पाटील यांचे ही या संपुर्ण निवडणुकीच्या प्रक्रीयेत सहकार्य लाभले.

Protected Content