काव्यरत्नावली चौकात व्यसनाच्या होळीचे दहन ! (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात गुरुवारी १७ मार्च रोजी सायंकाळी चेतना व्यसनमुक्ती केंद्र व युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने  व्यसनांच्या होळीचे दहन करण्यात आले.

याप्रसंगी याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार राजूमामा भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, इस्कान मंदीरचे अध्यक्ष प.पू.श्री. परमात्मा प्रभुजी, रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप शर्मा, क्रीडा प्रशिक्षक प्रवीण पाटील, डॉ. सुदर्शन पाटील,  पाटील बायोटेकचे संचालक प्रमोद पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि युवा फाउंडेशनच्या वतीने व्यसनांना तिलांजली देण्यासाठी ‘चला करूया व्यसनांची होळी’ असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करण्यात आला. दारू गुटखा, तंबाखू, सिगारेट या समाजात तासंतपास मोबाईल बघण्याचे व्यसन चालले आहे. कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संकल्प करण्याची शक्ती अत्यंत उपयुक्त ठरते, असे यावेळी उपस्थित मान्यवरांकडून सूर निघाला. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते व्यसनांची होळीचे दहन करण्यात आले.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1888483464672576

Protected Content