नराधम बापाकडून मुलीच्या खूनाची कबुली

Taluka

जळगाव प्रतिनिधी । तालुका पोलीस ठाण्याच्या निमखेडी शिवारात राहत असलेल्या संदीप चौधरीने कौटुंबिक कलहातून आपल्या सात वर्षाच्या मुलीचा गिरणा नदीच्या बांभोरी पुलाजवळ गळा आवळून खून केल्याचा प्रकार आज गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास समोर आला आहे. कोमल संदीप चौधरी असे मयत मुलीचे नाव असून पोलिसांनी संशयित आरोपीला पारोळा येथून अटक केली असून खूनाची कबुली दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, संदीप यादवराव चौधरी (वय-33) रा.करणगाव ता. अमळनेर ह.मु. हिरा गौरी पार्क खोटे नगर येथे पत्नी नयना आणि सात वर्षी मुलगी कोमल सोबत राहतो. दीड वर्षांपासून जळगावात वास्तव्यास होता. वेल्डींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बुधवारी दुपारी 4 वाजता मुलगी कोमल खासगी क्लासला गेली होती. बैठकीला जावून येतो असे संदीपने पत्नी नयनाला सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर संदीप मुलीच्या क्लासमध्ये जावून कोमलला सोबत घेतले. त्यावेळी त्यांनी मुलीचे दप्तर देखील सोबत घेतले नाही. दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत पती संदीप चौधरी आणि मुलगी कोमल घरी आले नसल्याचे चिंतेत होती. रात्री 10 वाजता दोघे घरी न आल्याने नयनाने तिच्या नातेवाईकांना फोनवरून दोघे बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर कोमलच्या मामा आणि काकाकडून दोघांचा शोध सुरु झाला. मात्र रात्रभर ते सापडले नाही म्हणून त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद करण्यात आली होती.

दुकान मालकाला टाकला मॅसेज
वेल्डींग दुकानदाराने हा मॅसेज मयत कोमलची आई व नातेवाईकांना दाखविल्यानंतर नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेतली. कोमलची ओळख पटल्याने नातेवाईक व आईने हंबरडा फोडला. संशयित आरोपी संदीने मुलीचा खून केल्यानंतर खाजगी वाहनाने धुळे बसस्थानकात मुक्काम केला. सकाळी 4.30 वा धुळे ते पारोळा असा बसने पारोळा येथे आला. त्यानंतर त्याने वेल्डींग दुकानाच्या मालकाला मॅसेज केला की, ‘मी माझ्या मुलीला बांभोरी गिरणा पुलाजवळ मारुन टाकले आहे व मी पारोळ्यातील शासकीय आयटीआय महाविद्यालयाच्या आवारात आत्महत्या करणार आहे’ असे नमूद केले.

घटनास्थळी पोलीसांची धाव
अप्पर पोलीस अधीक्षक निलाभ रोहम, भाग्यश्री नवटक्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निर्क्षक बापू रोहम यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. यावेळी फॉरेन्सी, ठस्सेचे पथक, मुलीजवळ असलेल्या रक्ताचे नमूने आणि काही वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान, संशयित आरोपी संदीप चौधरीच्या मोबाईलचे लोकेशनुसार तो पारोळा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तालुका पोलीसांनी पारोळा पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पारोळ्याहून संशयितास केली अटक
चौधरी दाम्पत्य हे गेल्या दीड वर्षांपासून जळगावात वास्तव्यास आहे, वेल्डींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तालुका पोलीसांनी संदीप चौधरी यांची माहिती दिल्यानंतर अनुषंगाने पारोळ्याचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांचे मार्गदर्शनाने पो.कॉ. पंकज राठोड व पो.कॉ. सुनिल साळुंखे यांनी संदीप चौधरी याचा त्याचे नातेवाईक दिनेश चौधरी यांच्या मदतीने शोध घेतला. संदीप चौधरी हा शासकीय आयटीआय महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानातून अटक केली. त्याला विश्वासात घेवुन या प्रकरणाबाबत विचारपूस करता त्याने घरगुती नवरा-बायकोच्या नेहमीच्या वादाच्या संतापातुन त्याची स्वतःची मुलगी कोमलला गिरणा नदी जवळील नर्सरीजवळ आणुन तिचा हाताने गळा आवळून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे.

Protected Content