वाहून गेलेल्या ‘त्या’ मुलाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेल्फी घेण्याच्या नादात कांताई बंधाऱ्याच्या पाण्यात पडून बडून वाहून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह दुपारी आढळून आला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

नयन योगेश निंबाळकर (वय-१७) रा. मिथीला अपार्टमेंट दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगरातील मिथिला अपार्टमेंट येथील १० ते १२ जण कांताई बंधारा येथे रविवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता फिरण्यासाठी कांताई बंधारा येथे गेले होते. यातील अचानक एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली होती. तिला वाचविण्यासाठी इतर तिघांनी पाण्यात उडी घेतली. यामध्ये समीक्षा विपिन शिरूडकर (वय-१७), योगेश दामू पाटील (वय-२०) आणि सागर दामू पाटील (वय-२४) यांना वाचवण्यात यश आले होते. परंतू यामध्ये तिघांपैकी नयन योगेश निंबाळकर (वय-१७) हा पाण्यात वाहून गेला होता. रात्री उशीरापर्यंत त्यांचा मृतदेह न मिळाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा महापालिका आणि जळगाव तालुका पोलीसांनी शोधकार्य मोहिम सुरू केले होते. दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गिरणा नदी पात्रात आढळून आला. या ठिकाणी आढळून आला. तालुका पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी जमली होती. नयनच्या पश्चात आई, वडील, बहिण, काका, काकू, आजी असा परिवार आहे.

Protected Content