स्वस्त धान्य दुकान ३ महिन्याकरीता निलंबित; कारण जाणून घ्या !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपरी खुर्द प्र.प्रा. येथील स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीनंतर तीन महिन्याकरीता निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपरी खु” प्र. प्रा. येथील स्वस्त धान्य संदर्भात तक्रार करण्यात आली होती. तक्रारदार वैशाली किशोर पाटील व यशोदाबाई कचरू पाटील त्यांच्या तक्रारीनुसार दक्षता समिती सदस्याचे नावाचे फलक दर्शनी भागात लावलेले नाहीत, दुकानाच्या दर्शनी भागात लाभार्थ्यांच्या याद्या लावलेल्या नाही, धान्य दराचे फलक दर्शनी भागात लावलेले नाही, तक्रार नोंदवही उपलब्ध करून दिलेली नाही, धान्याचे नमुने दर्शनी भागात ठेवावे, या बाबी आढळुन न आल्याने तक्रार करण्यात आली होती. अध्यक्ष सावित्रीबाई महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीत आढळून आलेले दोष हे गंभीर स्वरूपाचे दिसून आले असुश अ. क्र. १ ते१० बारकाईने निरीक्षण केले असता सावित्रीबाई महिला बचत गट दुकान क्रमांक ५४ यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे विनियमन आदेश १९७५ मधील तरतुदीचे तसेच प्राधिकार प्रतीतील अटी शर्तीचे भंग केलेला असल्याचे दिसून आल्याने त्यांचे स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र तीन महिन्यांकरिता निलंबित करावे. सब जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव उप विभागातील क्रमांक २ ते ४ नुसार त्यांना करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र अनुसूचित वस्तू वितरणाचे नियम आदेश करीत आहे. मौजे पिंपरी खु” ता. पाचोरा जि. जळगाव येथील अध्यक्ष, सावित्रीबाई महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५४, या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिने पर्यंत निलंबित करण्यात आलेले आहे. असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनिल सूर्यवंशी यांनी काढले आहेत.

Protected Content