मार्केट परिसरातून तरूणाच्या मोटारसायकलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून तरूण शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रविवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजानंद रावण खैरनार (वय-३४) रा. मेहरूण, दत्तर नगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. गुरूवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता तुळजानंद खैरनार हा मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीके ४७०५) ने कामाच्या निमित्ताने आलेला होता. त्याने गोलाणी मार्केट परिसरात मोटारसायकलपार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्याने त्याची २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकलचोरून नेली. त्याने मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवारी ११ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

Protected Content