यावल येथे गांजाची लागवड : गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव शिवारात गांजा लागवडीच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे अवैध व्यापाऱ्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार] यावल तालुक्यातील भालशिव शिवारात चैत्राम गेंदा सोनवणे (वय-६०) यांनी आपल्या शेतात मानवी आरोग्यावर परिणाम करणारे अमली पदार्थाची आपल्या शेतात लागवड केली असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली असता आज दिनांक ९ एप्रील रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पोलीस अमलदार असलम खान , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर , सुशिल घुगे, राजेश वाढे तर सरकारी पंच म्हणुन परसाडे येथील तलाठी समीर निजाम तडवी व स्वप्निल शशीकांत तायडे यांच्या पथकाने गावाचे पोलीस पाटील सचिन हिरालाल तायडे यांच्या मदतीने शेतात जावुन पाहणी केली असता त्या ठीकाणी ४२ किलो ५०० ग्राम वजनाचे ओले गांजाचे झाड किमत २ लाख ५५ हजार रुपये इतकी हे शेतात लागवड केल्याचे मिळुन आले.

 पोलीसांनी पंचनामा करून सर्व झाडे तोडुन दोन गठ्ठे दोरीने बांधुन सिल केली असुन , याबाबत  सहाय्यक फौजदार कैलाससिंग उमरावसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी चैत्राम गेंदा सोनवणे यांच्या विरुद्ध अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम१९८५चे कलम ८ ( ख ) २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल खान , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार असलम खान , पोलीस अमलदार संजय तायडे , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर हे करीत आहे.

 

Protected Content