आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रीत कामाला लागावे- निरीक्षक अविनाश आदीक (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । आपल्या पक्षाचे प्राबल्य वाढविण्यासाठी व पुढील  काळातील येणाऱ्या सर्व निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षाअंतर्गत कुठलेही मतभेद न ठेवता संघटीतपणे एकत्र येवुन कामास लागावे अशा सुचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरिक्षक अविनाश आदीक यांनी यावल भेटी दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलतांना व्यक्त केले.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरिक्षक अविनाश आदीक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड रविन्द्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. दरम्यान या बैठकी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन, जवळ येवु घातलेल्या नगरपरिषद व जिल्हापरिषद निवडणुकीच्या येणाऱ्या कालखंडात महाविकास आघाडीचे घटकपक्षांची रणनिती पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांच्या संदर्भात महावितरणाच्या विद्युत मंडळा विभागात होत असलेला गोंधळ अशा विविध अडचणी संदर्भात पक्षातील पदाधिकारी यांनी आपली गऱ्हाणे मांडली. यावेळी पक्षाचे निरिक्षकअविनाश आदीक यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भावना जाणुन घेत आपला अडचणी पक्षश्रेष्ठी प्रयत्न पहोचतील व या वर त्यांचा निर्णय होईल असे सांगुन येणाऱ्या जवळच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांचे बलस्थान व आत्मविश्वास वाढविणारे असे जळगाव जिल्ह्याला उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या रूपात संपर्कमंत्री म्हणुन खंबीर नेतृत्व लाभणार असल्याचे संकेत आदीक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना दिलेत.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी पक्षाच्या माध्यमातुन केलेल्या आपल्या कार्याचा आढावा पक्षनिरीक्षकांना सादर केला. या बैठकीस राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, पक्षाच्या सामाजीक व न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष नाना बोदडे, यावल नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश कोलते, गिरधर  पाटील, विजय पाटील, वसंत पाटील, फैजपुरचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, युवकचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, जी.पी. पाटील, अरूण लोखंडे, गनी भाई, अय्युब खान, अमोल दुसाने, बापु जासुद यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content