यावल येथे कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड

यावल प्रतिनिधी । येथे काँग्रेस सेवा फाउंडेशन जळगाव जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आज यावल येथे संपन्न झाली असून यात विविध पदाधिकाऱ्यांची निवड प्रदेशाध्यक्ष अॅड. सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी आणि जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते अप्पासाहेब सोनवणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, गणेश बारसे, फैजपुर नगर परिषदचे नगरसेवक केतन किरंगे, समीर मोमीन, यावलचे नगरसेवक मनोहर सोनवणे, जाकीर भाई, गुलाम रसूल मेंबर, संदीप सोनवणे, यावल तालुका शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, हाजी गफ्फारशाह, अनिल जंजाळे, राहुल तायडे, अजय बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

सदर निवड यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन, यावल शहराध्यक्ष नईमशेख, फैजपूर शहराध्यक्ष हर्षल दाणी, यावल तालुका मीडिया प्रमुख धिरज उर्फ विक्की पाटील, जिल्हा सचिव भूषण निंबायत, बामणोद गावाच्या अध्यक्षपदी हाजी तौफिक अशी निवड करण्यात आली. सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने त्यांचे काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी आ.रमेश चौधरी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जि. पाटील, कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र सरचिटणीस कपिल सूर्यवंशी, शुभम शिंदे, संदीप माळी, गौरवसिंग चौहान, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब आर. जी. पाटील, छोटू पाटील, समीर तडवी, लीलाधरसेठ चौधरी, विलास तायडे, चंद्रकला इंगळे,मनीषा पाटील, मनीषा पाचपोळे, मीनाक्षी जावरे, मोहिनी राणे, हाजी शब्बीर खान, युनूस पिंजारी, किरण महाजन, नितीन चौधरी, कलीम मेंबर, हाजी ताहेर शेख चाँद,भगतसिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, विवेक सोनार, अनिल महाजन, शाम पाटील, अनिल पाटील, गजुभाऊ पाटील, सक्लेन शेख,समाधान पाटील, समाधान सोनवणे, अनिल बडगुजर आदी जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Protected Content