कोरोना : जिल्ह्यात आज १ हजार १६७ बाधित रूग्ण आढळले; १ हजार १७६ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात आढळून आलेल्यापेक्षा बरे होणारे रूग्ण अधिक आहेत. जिल्ह्यात आज १ हजार १६७ बाधित रूग्ण आढळून आले तर १ हजार १७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ तालुक्यात संसर्ग कायम आहे. दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून यात एरंडोल तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. 

आजची जिल्ह्याची आकडेवारी

जळगाव शहर-१६०, जळगाव ग्रामीण-४४, भुसावळ-१८०, अमळनेर-७५, चोपडा-१६३, पाचोरा-४४, भडगाव-३४, धरणगाव-४७, एरंडोल-४१, जामनेर-७४, रावेर-३९, पारोळा-५, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-४४, बोदवड-३ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आज आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ९९ हजार ४५६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८५ हजार ९८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ११ हजार ७०९ बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला असून यात एरंडोल तालुक्यातील ४ तर पाचोरा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content