रावेर येथे अवैध गौण-खनिज वाहतूक करणारे वाहन ताब्यात

valu lilav

 

रावेर प्रतिनिधी । रात्रीच्या सुमारास भिंगी रेतीची अवैध वाहतुक करणा-या टॅक्टर-टॉलीला महसूल पथकाने पकडले असून शहरात देवगुणे प्रशासनाचा कारवाईचा तडाका सुरुच आहे. या कारवाईमुळे अवैध गौण-खनिज वाहतुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मंडळ अधिकारी प्रदीप आळे यांच्या माहिते प्रमाणे रात्रीच्या सुमारास भिंगी रेती घेऊन अवैध पध्दतीने वाहन क्रमांक (एमपी 12 -1952 टॅक्टर-टॉली) रावेर शहरातून जात असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळली होती. ही गुप्त माहिती मिळताच महसूल प्रशासनाने सापळा रचत वाहन ताब्यात घेतले आहे.

महसूल मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादासाहेब कांबळे, यासिन तडवी, शैलेश झोलटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यामुळे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी कारवाई धडाका सुरुच ठेवला आहे, तर लवकरात- लवकर वाळूचे ठेके करण्याची मागणी वाळू वाहतूकदारांकडून होत आहे.

Protected Content