मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्याकडून धार्मीक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील नामवंत मेडीकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान टाकून धार्मीक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ जुलै रोजी रात्री ८ वाजता पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून विद्यार्थ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शाहीद शेख अब्दुल रहिम रा. मोमीन मोहल्ला, न्हावी ता. यावल असे

 

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित मेडीकल महाविद्यालया वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मोहंमद शाहीद शेख अब्दुल रहिम या विद्यार्थ्याने मंगळवारी ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता इन्स्ट्राग्रामवर धार्मीक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे समोर आले. ही पोस्ट ठिकठिकाणी व्हायरल केली. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मंदार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी  मोहंमद शाहीद शेख अब्दुल रहिम याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

Protected Content