वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टरवर पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप जवळून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर तालुका पोलीसांनी पकडले. याप्रकरणी मंगळवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शहरातील खोटे नगर येथे कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलीसांनी जप्त केले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना ट्रॅक्टर चालक मुकेश पेरकाश सपकाळे (वय-३३) रा. निमखेडी ता.जि.जळगाव याच्याकडे आढळून आला नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ट्रॅक्टर चालक मुकेश सपकाळे याच्या विरोधात सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Protected Content