ट्रकचालकाकडून वाहतूक पोलीसाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । ट्रकने कारला धडक दिल्यामुळे महामार्गावर वाहतुक खोळंबल्याने वाहतुक पोलीसाने ट्रकचालकास वाहन बाजूला करण्याचे सांगितले. परंतु त्याचा राग आल्याने ट्रकचालकाने वाहतुक पोलीसाला शिवीगाळ करीत त्याला जीवेठार मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शहर वाहतुक पोलीस साहेबराव कोळी हे अजिंठा चौफुलीवर नेमणुकीस आहे. दुपारी 1 वाजेच्या सुमारास (एमएच 19 सीवाय 1581) क्रमांकाच्या ट्रकने (एमपी 09 4264) क्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघामुळे महामार्गावरील वाहतुक काही प्रमाणात खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच साहेबराव कोळी हे शरद सुलाने यांच्यासोबत वाहतुक सुरळीत करण्यासठी याठिकाणी आले. ट्रकचालक किशोर शांताराम पाटील याला ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितला असता. त्याने वाहतुक पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवा केली.

वाहतुक पोलीसाला दिली जीवे ठार मारण्याची धमकी
ट्रकचालक किशोर याला वाहतुक पोलिसांनी ट्रक खाली उतर असे सांगताच किशोर याने त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कोळी यांच्या छातीत लाथ मारीत त्यांच्या तोंडाला बुक्का मारत त्यांना जाखमी केले. तसेच त्यांना बेलवर येईन पण तुला खल्लास करीन अशी जीवेठार मारण्याची धमकी त्या ट्रकचालकाने दिले.

ट्रकचालकाने घातला पोलसांसोबत वाद
या घटनेची माहिती वाहतुक पोलीस सुलाने यांनी कंट्रोल रुमला दिली. यावेळी काही वेळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चंद्रकांत पाटील व विजय बावस्कर हे याठिकाणी आले. त्यावेळी ट्रकचालक किशोर याने त्यांच्यासोबत देखील झटापट करीत होता. पोलिसांनी त्याला वाहनात टाकून एमआयडीसी पोलीसात आणले. याप्रकरणी ट्रकचालक किशोर शांताराम पाटील रा. खोटेनगर याच्याविरुद्ध वाहतुक पोलीस साहेबराव कोळी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील हे करीत आहे.

Protected Content