‘त्या’ लाच प्रकरणाची होणार चौकशी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांकडून बदलीसाठी घेतलेल्या व नंतर परत केलेल्या रकमेची चौकशी करण्यात येणार असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील तीन शिक्षकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपयांची लाच घेऊन त्यांची बदली अपेक्षित ठिकाणी न केल्याने संबंधित शिक्षकांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणात आमदार चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधित शिक्षणाधिकार्‍यांनी लाचेची रक्कम परत केली होती. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी रवींद्र हिंमतराव शिंदे यांनी केली होती. त्यामुळे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी ३० रोजी सीईओंना पत्र दिले. या पत्रात सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता या लाच प्रकरणात नेमके काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content