नवीन शैक्षणिक धोरणातील इंटर्नशिप बाबत विद्यापीठात मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने सामाजिक शास्त्रे प्रशाळा, मानव्य विज्ञान प्रशाळा, भाषा आणि योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणातील इंटर्नशिप बाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवार ५ एप्रिल रोजी कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेसाठी १२९ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. जगदीश पाटील, समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील यांनी इंटर्नशिप व ओजेटी यातील फरक स्पष्ट करून करीअर साठी इंटर्नशिप फलदायी ठरणार असल्याचे सांगितले. प्रा. डोंगरे यांनी इंटर्नशिप हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. डॉ. जवळेकर यांनी प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये इंटर्नशिप विद्यार्थ्यांना दिली जावी यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले. प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. उमेश गोगडीया यांनी प्रास्ताविक केले.

Protected Content