इंग्रजी शिक्षकांमार्फत चालवलेले मासिक दिशादर्शक-सोनवणे

अमळनेर प्रतिनिधी । इंग्लिश असोसिएशन जळगाव मार्फत चालवलेले ‘इंग्लिश जर्नी वीथ यू’ हे मासिक संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन वाय.आर. सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगाव व प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक स्तरावरील इंग्रजी शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन अल्पबचत भवन, जळगाव येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन धरणगाव तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिर्‍हाडे यांनी केले. जिल्ह्यातील एकूण ४०० पेक्षा जास्त इंग्रजी भाषा शिक्षकांची उपस्थिती सदर कार्यक्रमास लागली होती. सभागृह भरगच्च भरलेले होते. अभ्यास मंडळातील सदस्य व इ- मेल्टाचे राज्याध्यक्ष साहेबराव महाजन यांनी न्यू इव्हँल्युएशन पॅटर्न या विषयावर मार्गदर्शन करत शिक्षकांना खिळून ठेवले. जिल्हाभरातून आलेल्या इंग्रजी शिक्षकांनी विविध प्रश्‍न विचारत हे सत्र अतिशय समृद्ध बनवले. चेस या इंग्रजी प्रोजेक्टमध्ये तीन वर्ष व्यवस्थित पद्धतीने प्रशिक्षण पार पाडणार्‍या सर्व मेंबर्सना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी साठी सदर प्रशिक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी दुसर्‍या सत्रातील आपल्या अध्यक्षिय मनोगतात सांगितले.

सदर असोसिएशन इंग्रजी शिक्षकांसाठी अतिशय लाभदायी असल्याचे उद्घाटक अशोक बिर्‍हाडे यांनी सांगितले. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव गणेश बच्छाव यांनी संस्थेची उद्दिष्टे सादर केली. तसेच प्रमोद आठवले यांनी संस्थेच्या ब्लॉग संदर्भात सविस्तर सादरीकरण केले. डॉक्टर संगीता महाजन यांनी आपल्या मनोगतात त्यांचा मेडिकल स्टोरकीपर ते एमपीएससी टॉपर असा प्रवास मांडला. प्रमुख पाहूण्यांचा परिचय संजय बारी यांनी करुन दिला. सक्सेस स्टोरीचे वाचन प्रभावती बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व इंग्लीश जर्नी वीथ यू मासिकाची भूमिका मासिकाचे संपादक व असोशिएशनचे अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी मांडली. सूत्रसंचालन श्रीमती संगीता भोसले, सरला ढगे व टी.बी. पांढरे यांनी केले. तर सत्र एक कार्यक्रमाचे आभार श्रीयुत एम. आर.चौधरी व सत्र दोनचे आभार आर के पाटील यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वितेसाठी असलम शेख, रणजीत सोनवणे, वाय.टी.पाटील, रावसाहेब जगताप, प्रविण मोरे, सुधीर महाजन, डी.बी. पाटील, हेमकांत लोहार, गणेश सूर्यवंशी, भैय्यासाहेब सोनवणे, शंकर भामरे, बी एन पाटील, आर.के.पाटील, हरी माळी, राहुल सोनवणे, भागवत बेडसे व हेमराज पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content