अमळनेरला संविधान बचाओ समितीचे गठन

अमळनेर प्रतिनिधी । येथे संविधान बचाओ संघर्ष समिती चे गठन करण्यात आले असून विविध मागण्यांसाठी समितीतर्फे दि.३ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

अमळनेर तालुकास्तरावर संविधान बचाओ संघर्ष समितीच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात होणार्‍या बेकायदेशीर बाबींच्या बाबतीत संविधानात्मक मार्गाने आंदोलन करून विरोध नोंदविणे साठी दि.३ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन जाहिर करण्यात आले आहे. येणार्‍या लोकसभा निवडणुका ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपर वर पारदर्शकपणे कराव्यात. संविधानात्मक तरतुदींच्या विरोधात केंद्र सरकारने आर्थिक निकषावर आधारित दिवसाला दोन हजारावर कामविणारा सवर्ण आर्थिक आरक्षणास पात्र ठरविल्याने जाहीर केलेले १०% आरक्षण फसवे असून ते रद्द करावेे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,इतर मागासवर्गीयांना लोकसंख्या च्या आधारावर पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावे. ओ.बी.सी. भटके, विमुक्तांची जाती आधारित जनगणना करावी. इतर मागासवर्गीयांना लावलेले क्रिमिलियर हटवावे. खाजगी क्षेत्रात आरक्षण कायदा लागू करावा. एस.सी.एस.टी अन्याय अत्याचार कायदा अधिक सक्त करावा. आदि मागण्यांसाठी विविध सामाजिक, पुरोगामी, चळवळीतील संघटना संविधान बचाओ संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रांताधिकारी व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संविधान बचाओ संघर्ष समितीचे तालुका संयोजक रणजित शिंदे यांनी कळविले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव पाटिल,हिरालाल पाटिल,विश्‍वास पाटिल, विजय गाडे,राजेश मोरे, संदिप सैंदाणे, कमलाकर संदानशिव, प्रा.लिलाधर पाटिल यांचेसह समितीचे सदस्य संजय मरसाळे, सुरेश कांबळे, प्रविण बैसाणे, दाजीबा गव्हाणे,अरविंद बिर्‍हाडे, प्रमोद बिर्‍हाडे, दिपक खोंडे, जितेंद्र ठाकूर, मौलाना रियाज,नावेद शेख, सत्तार खान,फैयाज शेख, अत्ताउल्लाह शेख,यशवंत बैसाणे,असलम हातीम, कुदरत अली, गणेश चव्हाण, आत्माराम अहिरे,अजय भामरे, जितेश संदानाशिव, सुनिल जाधव,विजय खैरनार, समिती सदस्य कैलास पाटिल, सुनिल पाटिल आदिंनी केले आहे.

Add Comment

Protected Content