मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; टॅंकर चालक ठार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर २४ मार्च रविवारी रोजी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईला एक दुधाने भरलेले टँकर जात होते. टँकर चालकाने लेन बदलली असता टॅंकर अचानक कोलमडले, हे टँकर समोरील बाजूला कारवर धडकले आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांने जोरदार धडक दिली. त्यामुळे दूध संपूर्ण रस्त्यावर सांडले. अपघातातील दुधाच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कारचा चुराळा झाला, परंतू सुदैवाने कारमधील दोन्ही जण वाचले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पाठवले. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक बंद होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरुळीत करण्याचे काम सुरु केले. टँकर रस्त्याच्या बाजूला हलवण्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.

Protected Content