ॲक्सिस बँकेतील १५ हजार कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

axis bank

मुंबई वृत्तसंस्था । खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेमधील १५ हजार कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. बँकेने कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. नव्या पध्द्तीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राजीनामा देणे पसंत केले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या सेवांमधील हजारो कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यात राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बँकेने कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. सध्याचे वर्क कल्चर जुन्या जाणत्या कर्मचाऱ्यांसाठी अवघड बनले आहे. यामुळे बऱ्याच कालावधीपासून बँकेत काम करणारे कर्मचारी राजीनामा देत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारखे नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यास जुने कर्मचारी अपयशी ठरल्याने राजीनाम्याचे प्रमाण अधिक आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा कमर्चारी सोडून जाण्याचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या वर्षी ते १५ टक्के होते. नुकताच बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी जयराम श्रीधरन यांनी राजीनामा दिला होता. बॉण्ड ट्रेडिंगचे प्रमुख शशिकांत राठी, जेपी सिंग, सिरील आनंद यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

Protected Content