मराठा आरक्षणावरील सुनावणी आता जानेवारीत होणार

maratha aarkashan

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावर होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. हायकोर्टाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणे अपेक्षित होते. परंतु, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात घेणार असे स्पष्ट केले आहे.

 

राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेता 16 टक्के आरक्षणाचा कायदा आणला. परंतु, हायकोर्टाने तो वैध ठरवतानाच त्याची टक्केवारी कमी करून 12-13 टक्के केली. 27 जूनला आलेल्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या सर्वच याचिका एकत्रित करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यावर आता 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार असे जाहीर केले.

Protected Content