हे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं : देवेंद्र फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था | उद्यापासून राज्यात विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं असून चर्चा टाळण्यासाठी हे लहान स्वरूपातील अधिवेशन घेतले जात असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्यापासून राज्यात विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, परीक्षेतला होणारा उशीर, होणारा गोंधळ, पेपरफुटी प्रकरण, अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होऊन धुमश्चक्री माजण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक प्रश्नांमुळे अधिवेशनात विरोधकांना मुद्दे मिळणार आहेत. या अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक संपन्न झाली असून त्यात या अधिवेशनात मांडायच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.

दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून हे सरकार चर्चा टाळण्यासाठी हे लहान स्वरूपातील अधिवेशन घेतले जात असल्याची टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याची पद्धत डावलून नियमबाह्य मतदान प्रस्ताव सादर केले जाणे म्हणजे सरकारने लोकशाही नसून फक्त ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु असल्याचे त्यानी सांगितले”

दोन वर्षं झाली तरी हे डेटा गोळा करू शकणारे हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत उघडे पडलेले आहेत. असे म्हणत विजेचे कनेक्शन कापण्याचे काम या राज्यात सुरु असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. “हे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं असून विरोधकांनी बोलू नये याची खबरदारी घेत आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे असं म्हणत १२ आमदार बाहेर ठेवून अध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची?” असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Protected Content