दानवेंचा डीएनए हिंदूस्तानचा की पाकिस्तानचा ? : बच्चू कडू

मुंबई । शेतकर्‍यांच्या आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल करत दानवेंचा डीएनए हिंदूस्तानचा की पाकिस्तानचा ? असा प्रश्‍न विचारला आहे.

रावसाहेब दानवेंनी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. हे आंदोलन चालू आहे. हे शेतकर्‍यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. यामुळे दानवेंवर बच्चू कडू संतापले आहेत.

याबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना कडू यांनी दानवेंवर टीका केली आहे. सर्व देशभरात शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकर्‍याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Protected Content