कुसुंबा येथे दोन गटात तुफान हाणामारी; चॉपर हल्ल्यात चौघे जखमी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री ८ वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात घरात घुसून सर्व सामानाची तोडफोड करीत चार जणांवर चॉपरने हल्ला झाल्याने जखमी झाले असुन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अक्षय सोनवणे याने दिलेल्या माहितीनुसार, दीपक कोळी, आकाश कोळी व भीकन कोळी हे तीघे गल्लीत बसून शिवीगाळ करीत होते. त्यांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे तीघांनी थेट हातात चॉपर घेऊन हल्ला चढवला. घरात घुसून सर्व सामानाची तोडफोड केली. दगडाने वस्तु फोडल्या. त्यांच्या हल्ल्यात भास्कर सोनवणे, अक्षय सोनवणे, मुन्ना सोनवणे व कुंदाबाई सोनवणे हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या हाणामारीत दीपक, आकाश व भीकन कोळी हे देखील जखमी झालेले आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Protected Content