अबीलहोळ तांडा येथे मंत्री महाजन यांनी बंजारा बांधवासोबत साजरा केला होळी सण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | होळीचा सणाला बंजारा समाजामध्ये विशेष महत्त्व असून यामुळे बंजारा समाजाची होळी ही एक आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरी केली जाते या बंजारा समाजाच्या होळीमध्ये सामील होण्यासाठी राज्याचे ग्राम विकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ तांडा येथे बंजारा समाजासोबत पारंपारिक रित्या मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. यावेळी त्यांनी बंजारा महिलांचे होळी नृत्य पाहिले, त्याचबरोबर बंजारा पुरुषासोबत नृत्य करून बंजारा समाजाच्या होळी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बंजारा बांधवांसोबत रंगाची होळी खेळली त्याचबरोबर बंजारा बांधवांच्या होळीचे विशेष महत्त्व मंत्री महाजन यांना सांगण्यात आले.  त्याचबरोबर गीताच्या माध्यमातून महिला व पुरुषांनी ग्रामविकास मंत्री यांचे स्वागतही केले व यावेळी राम मंदिर मोदींनी बांधले तो सण कसा साजरा झाला हे गीत बंजारा भाषेत सादर करण्यात आले.

मोठ्या उत्साह यावेळी बंजारा बांधव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये होळी सण साजरा केला यावेळी माजी जि प सदस्य जे के चव्हाण, गटनेते डॉ.  प्रशांत भोंडे बंजारा समाजाचे जेष्ठ नेते दौलतसिंग पवार, राजेश नाईक देलसिंग चव्हाण भाजपा  तालुका उपाध्यक्ष भाईदास चव्हाण, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण, दिलीप चव्हाण, ग्यानदास चव्हाण, पुनमचद नाईक, पदंम नाईक, बाबुसिंग चव्हाण, नटवर चव्हाण, दिलीप चव्हाण, शत्रुघन चव्हाण, किसन राठोड, अगुर चव्हाण, उप सरपंच देविदस चव्हाण, बद्री नाईक यांच्यासह बंजारा समाजाचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Protected Content