राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी ; भाजपची मागणी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 16 at 9.54.36 PM

जळगाव, प्रतिनिधी | राफेल प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चीट दिली. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी यासाठी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आमदार तथा भाजपा महानगराध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांनी राफेल प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चीट दिल्याने कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आ. भोळे यांनी सांगितले की, पंतप्रधान हे कोणा एका पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांचा अपमान केला आहे. यामुळे जनतेची भावना दुखावल्या असल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी महापौर सीमा भोळे, मनपा भाजपा नगरसेवक,   जळगाव शहर व जळगाव ग्रामीणचे पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content