रावेर तालुक्यात ऑनलाईन खरेदीसाठी नाव नोंदणीचे आवाहन

d09725bf 2ffc 4b86 8ef4 bf7edfca4278

रावेर, प्रतिनीधी | खरीप हंगामात येणारी ज्वारी,बाजरी, मक्याचे खरेदी करण्याची व ऑनलाईन मुदत खरेदी विक्री संघातर्फे निश्चित करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतक-यांनी नाव नोंदण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

खरीप हंगामातील शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत ज्वारी,बाजरी,मक्याची उपअभिकर्ता संस्था म्हणुन रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघा मार्फत खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी ज्वारी, बाजरी व मका खरेदीची ऑनलाईन मुदत सोमवार १८ नोव्हेंबर पासुन ३१ डिसेंबरपर्यंत राहील. तसेच ज्वारी,बाजरी व मक्याच्या खरेदीसाठी आधार कार्डची झेरॉक्स, बँक पास बुकची झेरॉक्स, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर व ज्वारी, बाजरी व मका या पिकाची ऑनलाईन नोंद असलेला चालु वर्षाचा ७/१२ उतारा सादर करावयाचा आहे. सदर खरेदीसाठी शासकीय हमी भाव ज्वारीला २५५० रु प्रती क्विंटल, मका १७६० प्रती क्विंटल तर बाजरी २०००/ – रु प्रती क्विंटल प्रमाणे राहील. शासनाने वरील दर हे एफएक्यु दर्जाच्या धान्यासाठी निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी. आर. पाटील व मॅनेजर विनोद चौधरी यांनी केले आहे .

Protected Content