मराठा सेवा संघाची शहराची नुतन कार्यकारिणी जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक कार्य व संघटनात्मक कार्याची दखल घेत पाचोरा तालुका अध्यक्ष सुनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नवनिर्वाचित व र् अध्यक्ष किशोर पाटील यांच्या सुचनेनुसार मराठा सेवा संघाची पाचोरा शहराची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नुतन कार्यकारिणीत मराठा सेवा संघाच्या शहराध्यक्षपदी किशोर पाटील, महिला शहर अध्यक्षपदी चंद्रकांत बळवंत पाटील, शहर उपाध्यक्षपदी मनोज पाटील, शहर कार्याध्यक्षपदी रुपेश चव्हाण, अनिल पाटील, गणेश शिंदे, शहर प्रसिद्धी प्रमुखपदी नंदकुमार शेलकर, सचिवपदी शिवदास पाटील, सहसचिव पदी सोमनाथ अहिरे, पद्माकर पाटील, सुशिल पाटील, संदिप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा सेवा संघाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवुन समाजातील प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यप्रणव व कार्यरत राहावे. याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित शहर कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content