Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी सौ. माधुरी पाटील यांची नियुक्ती

मुक्ताईनगर भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी सौ. माधुरी पाटील यांची नियुक्ती

0
8


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या मुक्ताईनगर (दक्षिण) मंडळाच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सौ. माधुरी सचिन पाटील (रा. मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप तालुकाध्यक्ष जयपाल विरसिंग बोदडे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही घोषणा केली. पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री न.रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नियुक्तीपत्रात सौ. माधुरी पाटील यांच्यावर पक्षाने दाखविलेल्या विश्वासाचा उल्लेख करत, त्यांच्याकडून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा व धोरणे जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी सौ. माधुरी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound