चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ जून रोजी मध्यरात्री १ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. ऑक्टार २०२४ पासून परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ दादू सुनिल भिल वय २१ हा पिडीत मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिच्या सोबत शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ज्ञानेश्वर भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.