रावेरात मराठा समाजातर्फे विद्यार्थांचा गुणगौरव

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील स्टेशन रोडला लागुन असलेल्या मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजातर्फे विद्यार्थांचा गुणगौरव तसेच देणगीदारांचा फोटो अनावरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिक्षण खेळ समाजकारण अश्या विविध क्षेत्रात मराठा समाजाची विद्यार्थी/विद्यार्थीनी यशवंत होत आहे.आताच्या युवकांनी उद्योग क्षेत्राकडेही लक्ष घातले पाहीजे असे प्रतिपादन उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. चंद्रकांत पाटील माजी आ.अरुण पाटील, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील यांची उपस्थिती होती.

यांची होती उपस्थिती
यावेळी गोपाल दर्जी, शिवसेना तालुका प्रमुख प्रविण पंडीत, डॉ. एस. आर. पाटील, ग.स. संचालक निलेश पाटील, सोपान पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष निळकंठ चौधरी, सोपान पाटील, सारिका चव्हाण, जनाबाई महाजन, सरपंच प्रमोद चौधरी, घन:शाम पाटील, प्रशांत पाटील, योगराज पाटील, युवराज महाजन, सुरेश पाटील, प्रल्हाद पाटील, रमेश पाटील आदी मराठा समजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content