जमीनीचा योग्य मोबदला अन्यथा आंदोलन ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकगाव व सुनसगाव शिवारात चौथ्या रेल्वे लाईनच्या भुसंपादनाचा मोबदला रेडीरेकनर नुसार जास्तीत जास्त मिळवून न्याय देण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही या मागणीसाठी साकेगाव व सुनसगाव शिवारातील शेतकऱ्यांनी सोमवार ५ सप्टेंबर रेाजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ तालुक्यातील मौजे साकेगाव आणि सुनसगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या जमीनी चौथ्या रेल्वेलाईनसाठी भुसंपादन १८७/२०१७ प्रमाणे मंजूरी घेण्यात आली आहे. परंतू या जमीनीचे मुल्य ठरविण्या कामी जळगाव येथील नगर रचना विभागाकडून कोणतीही मंजूरी घेतलेली नसल्याचे दिसून आले. संपादीत क्षेत्राला संबंधित अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर बिनशेती दर दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या जमीनिला रेडीरेकनर नुसार जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर उघडपणे अन्याय झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. त्यामुळे अन्याय दुर झाल्याशिवाय शेतकरी कोणतीही रक्कम स्वीकारणार नाही असा पवित्रा घेतला असून संपादित केलेली जागेला योग्य भाव मिळवून देण्यात यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे..

या निवेदनावर शेतकरी रविंद्र पाटील, समिर बोंड, प्रकाश बोंडे, भरत बोंड, अमोल फालक, राजन फालक, प्रविण काळे, संजय काळे, अमोल फालक, यशवंत फालक, दिनेश कोलते, वासुदेव अत्तरदे, अरूण अत्तरदे, रमेश वारके, मधुकर वारके, अशोक वारके, दिलीप वारके यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/840725617333385

Protected Content