शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करा; अ‍ॅड. सूरज चौधरी यांचे निवेदन

रावेर प्रतिनिधी । शरजिल तारीक उस्मानी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा व धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच भारतीय संघ राज्याबद्दल घृणा निर्माण केल्याचा गुन्हा भादंवि कलम १५३ अ व २ ९ ५ अ व १२४ अ अन्वये दाखल करण्याची मागणी नगरसेवक अ‍ॅड. सूरज चौधरी यांनी केली आहे. 

नगरसेवक अ‍ॅड. सूरज चौधरी यांनी रावेर पोलीस स्थानकाच्या निरिक्षकांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की,  दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे आयोजीत एल्गार परिषदेत अलिगड मुस्लीम विद्यापिठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजिल उस्मानी याने अतिशय गंभीर धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह व समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केलेली आहे. याबाबत व्हाटसअ‍ॅप, फेसबुक व ट्विटरवर फिरत असलेली चित्रफीत ही दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी गणेश कला क्रीडा मंदिरातील आहे.

या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले त्या शरजिल उस्मानी याने भाषणात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक १५३ अव २९५ अ अनुसार गुन्हा ठरतो. तसेच त्याने भारतीय न्याय व्यवस्था , कायदेमंडळ व प्रशासकिय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही असेही विधान केले आहे. त्याचे हे विधान भारतीस संघराज्याचे अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे जे की भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ अनुसार गुन्हा तरी शरजिल उस्मानी याच्या संबंधीत कलमाअन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

 

 

Protected Content