गणेश कॉलनीत शतपावली करणाऱ्या तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील मोबाईल फोनवर संगीत ऐकणार्‍या विद्यार्थ्यांकडून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरटांनी ६ हजार रुपयांचा मोबाइल फोन हिसकावून घेतला. याबाबत जिल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील एलआयसी कॉलनीत महावीर निलेश कटारिया वय 16 हा त्याचे आई वडील, आजी, भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. महावीर हा बाहेती महाविद्यालयात 11 वी कॉमर्सला शिक्षण घेत आहे. मंगळवार, 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर महावीर हा पायी फिरत होता. फिरुन झाल्यानंतर गोकूळ स्वीट मार्टकडून रेल्वेगेटकडे जाणार्‍या रस्त्याने मोबाईलवर गाणे ऐकत महावीर घराकडे जात होता. मोबाईलवर गाणे बदलवित असताना, महावीरच्या पाठीमागून अ‍ॅक्टीव्हा या दुचाकीवरुन दोन जण आले.  दोघांपैकी मागे बसलेल्याने महावीरच्या हातातील मोबाईल हिसकाविला. यानंतर दोघेही रेल्वे गेटच्या दिशेने पसार झाले. याचवेळी रस्त्याने दुचाकीवर जात असलेल्या तरुणासोबत महावीरने चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे सापडले नाही. यानंतर महावीरने घरी पोहचून हा प्रकार त्याच्या वडीलांना कळविला. याप्रकरणी रात्री उशीरा महावीर याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

 

Protected Content