मांडूळ सापाची तस्करी करणारे चौघे अटकेत

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुर्मीळ मानल्या जाणार्‍या मांडूळ सापाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज वन खात्याच्या कर्मचार्‍यांना काही जण मांडूळ सापाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गोपनिय माहीतीनुसार मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रातील मुक्ताईनगर शहरात बर्‍हानपुर रस्त्याला रामभाऊ पेट्रोल पंपासमोर मांडूळ सापाची तस्करी करतांना अनुक्रमे विजयसींग मोरसींग राठोड , रा.मोरझीरा ता. मुक्ताईनगर; योगेश फुलसींग राठोड, रा. मोरझीरा; शांताराम बळीराम राठोड रा. मोरझीरा आणि रुपेश मदन राठोड, रा. मोरझीरा यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर व गस्तीपथक स्टाफ जळगाव, यांनी संयुक्तरित्या केली.

या चौघांच्या विरोधात वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८ (८), ४९, ५०, ५१, अन्वये वनपरिक्षेत्र अधिकारी, कु. कृपाली रामदास शिंदे, वनक्षेत्र मुक्ताईनगर, यांनी वनगुन्हा नोंद करुन मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही कार्यवाही उपवनसरंक्षक जळगाव वि.वि.होशिंग तसेच सहाय्यक वनसरंक्षक, (मृद व कॅम्पा ) यु. एम. बिराजदार, यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, श्रीमती दिपश्री जाधव वनपाल, वाय. जी. दिक्षीत वनपाल, तुळशीराम घरझाळे,वनरक्षक, नितीन खंडारे वनरक्षक, उल्हास पाटील वनरक्षक, संचलाल पवार, शंकर कोळी, रायसींग पारधी,नरेंद्र बारी, जितेंद्र धांडे, वनसेवक सर्व, वाहनचालक नबाब पिंजारी, योगेश जाधव डाटाएन्ट्री ऑपरेटर, या सर्वानी सहभाग घेतला.

Protected Content