Home क्राईम नशिराबाद येथे तीन बकऱ्यांची चोरी; पोलीसात गुन्हा

नशिराबाद येथे तीन बकऱ्यांची चोरी; पोलीसात गुन्हा

0
135

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथील एका मजूराच्या १६ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील कंडारी येथील मजूर आकाश लक्ष्माण परदेशी (वय-२६) हा बकऱ्या चारून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. दररोज सकाळी दाने तास आणि सायंकाळी दोन तास बकऱ्या चारण्यासाठी बाहेर घेवून रात्री घरी येतो. १२ मे रोजी रात्री नऊ वाजता बकऱ्या चारून घरी आला. कंडारी गावाच्या बाहेरील गाडेगाव रस्त्यावरील तांड्यावर सर्व बकऱ्या बांधल्या व घरी निघून गेला. रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १६ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात शोधाशोध करून बकऱ्या मिळाल्या नाही. अखेर एमआयडीसी पोलीसात धाव घेवून बकऱ्या चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण ढाके करीत आहे. 


Protected Content

Play sound