महिलेच्या पर्समधून १५ हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । एकाच रूग्णालयात दाखल असलेल्या पतीला भेटण्यासाठी आलेल्या पत्नीच्या पर्स मधून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील रहिवासी अलका लोणे हया पती मधूकर लोणे व मुलगी युवती पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी पती मधूकर लोणे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ जळगावातील शाहूनगरामधील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर ११ मे रोजी अलका यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना देखील मुलगी युवती हिने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तसेच मेडिकल बिलाकरीता साडे बारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रूपये युवतीने हिने आईला दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते. दरम्यान, गुरूवार, १२ मे रोजी पती मधूकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका हया आयसीयू रूममध्ये गेल्या, तेवढयात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरटयाने चोरून नेली. पाच ते सहा मिनिटानंतर त्या त्यांच्या जागेवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांना सुध्दा घटना कळविली. अखेर युवती राहुल पाटील यांनी गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content