चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार; पतीवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पत्नीच्या चारीत्र्यावर संशयावरून भाजी कापण्याच्या चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी गेंदालाल मिल परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीसात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आफ्रीनबी हारून खान हया गेंदालाल मिल येथे पती हारून मुस्तफा खान, सासू व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. पती हारून हा मालवाहतूक चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करतात. आज शुक्रवारी सकाळी सासू ह्या ईदनिमित्त नातेवाईकांना भेटण्यास गेल्या होत्या तर मुले देखील बाहेर गेली होती. त्यामुळे पती-पत्नी दोघे घरी होते. सकाळी ८.३० वाजता पती हारून याने पत्नीकडे दाढी करण्यासाठी पैसे मागितले व नंतर दाढी करण्यासाठी घराबाहेर पडले. काही वेळानंतर ते दाढी न करता घरी परतले. व पत्नीच्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला शिवीगाळ केली. हारून हा रागाच्या भरात स्वयंपाक घरात गेला. तेथून भाजी कापण्याचा चाकू आणून त्याने पत्नीच्या मनगटावर, छाती तसेच पोटाच्या मध्यभागी चाकूने वार केला. नंतर मारहाण केली.

चाकूच्या हल्ल्यामुळे मनगटातून रक्त निघत असल्याचे पाहून आफ्रीन यांनी आरडाओरड केली असता, गल्लीतील रहिवाश्यांनी खान यांच्या घराकडे धाव घेतली व भांडण सोडविले. नंतर आफ्रीन यांनी पोलिसात तक्रारी दिली व नंतर उपचारार्थ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्‍यात आले. याप्रकरणी पती हारूण याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content