रावेरात चोरट्याने मोबाईल लांबविला

mobilechorirp

रावेर (प्रतिनिधी)। रावेर शहरातील ज्वेलर्स बाजारतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुमारे 14 हजाराचा मोबाईल लंपास केले आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरातील गणेश ज्वेलर्स समोर महेश पाटील (रा. रसलपुर) सामान खरेदी करत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळ असलेला 12 हजार 500 रुपये कीमतीचा विवो कंपनीचा मोबाईल तसेच 1400 रुपये कीमतीचा जिओ कंपनीचा असे दोन मोबाईल कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Protected Content