पाचोऱ्यात तरुणाने घेतला गळफास

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी चेतन भगवान भोसले (वय – २५) यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसतांना घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. सदरचा प्रकार त्यांचे भाऊ आकाश भगवान भोसले यांचे लक्षात आला. मयत चेतन भोसले यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित करुन मयताचे शवविच्छेदन केले. चेतन भोसले यांनी आत्महत्या का केली ? यामागील कारण समजू शकले नाही. मयत चेतन भोसले हे ट्रक ड्रायव्हर असुन त्यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ,  तीन बहिणी (विवाहीत) असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रविंद्र बत्तीसे हे करत आहे. चेतन भोसले यांचे अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Protected Content