यावल तालुक्यात सागवान लाकडाची तस्करी; गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हरिपुरा व जामुनझीरा रस्त्यालगत विनापरवानगी सागवान लाकूड आढळून आले आहे. ही कारवाई जळगाव वनविभागाच्या पथकाने केली असून ३१ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड जप्त केला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार झालेले आहेत. याप्रकरणी यावल पश्चिम वनपरिक्षेत्र विभागात अज्ञातांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मौजे हरीपुरा ते जामुनझीरा रस्त्यालगत केळीच्या शेताजवळ खड्ड्यात असलेल्या केळीचे पालापाचोळ्यात लपवलेला विनापरवानगी सागवान इमारतीचे चौकटी लाकूड आढळून आले. लाकडांची मोजमाप केले असता ३१ हजार रुपये किमतीचे असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाने दोन पथके तयार केलेले आहेत.

ही कारवाई वनसंरक्षण डी. डब्ल्यू. पगारे, उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा, विभागीय वन अधिकारी यु.जी. वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षण पी. व्ही. हाडपे, व्हि.टी. पदमोर, वनपाल राजू शिंदे, रवींद्र तायडे, असलम खान, रज्‍जाक तडवी, वनमजूर अशोक जिरीमाळी, शिवाजी इंगळे, राजू भोईटे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी यांनी केली आहे.

 

Protected Content