दाणाबाजारात सट्टा खेळणाऱ्या तरूणावर कारवाई

 

जळगाव प्रतिनिधी ।  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाणाबाजार परिसरात ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता  बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळणाऱ्या सतिष मेघराजमल सिंधवाणी (वय -३०) रा. सिंधी कॉलनी या तरूणाला अटक केली. शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल रतनहारी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहरातील दाणबाजार परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानाजवळ मिलन व कल्याण मटका नावाचे सट्टाजुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोलीस नाईक राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, नाशिर शेख आणि रतन गिते यांनी सायंकाळी ४ वाजता छापा टाकून संशयित आरोपी सतिष मेघराम सिंधवाणी (वय-३०) रा. समाधा आश्रम रोड सिंधी कॉलनी याला जागेवर अटक केली. त्याच्या ताब्यातील ४३० रूपये रोख आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोहेकॉ रतन गिते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content