पाठवणीवेळी रडताना हृदयविकाराचा झटका ; नववधूचा मृत्यू !

 

 

भुवनेश्वर : वृत्तसंस्था ।   लग्नानंतर पाठवणीवेळी माहेर सोडताना नवरीला रडायला येणं सामान्य आहे. पण, ओडिशात  पाठवणीवेळी एक नववधू इतकी रडली की तिला हृदयविकाराचा झटका आला व जागीच तिचा मृत्यू झाला.

 

ओडिशाच्या सोनेपूर जिल्ह्यातील ही घटना असून गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असं मृत नवरीचं नाव आहे. बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचं लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळ आल्यापासूनच रोझीला रडू अनावर होत होतं. सतत रडत असतानाच बेशुद्ध होऊन ती जमिनीवर कोसळली. लगेचच नातेवाईकांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिच्या हाताची मालिश व तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

पण, तरीही ती न उठल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. गावातील एका व्यक्तीने सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच रोझीच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे ती तणावात होती. तिच्या काही नातलगांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण, आयुष्यातील सुखाचे दिवस पाहाण्याआधीच तिला मृत्यूने गाठलं व आनंदाच्या वातावरणावर एका क्षणात विरजण पडलं.

Protected Content