जबरी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईल हिसकावून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पुढील कारवाईसाठी संशयिताला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

शेख सादिक शेख नासिर वय-३८ रा. भिस्तीवाडा जाम मोहल्ला भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३३ इंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या हातातून जबरी मोबाईल हिसकावून चोरून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सूचना दिल्या होत्या. दरम्यान, जबरी मोबाईल हिसकावून मोबाईल हा संशयित आरोपी शेख सादिक शेख नासिर  याने लांबविल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. गुरुवार ९ जून रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल अनिल देशमुख, कमलाकर बागुल, विजय चौधरी यांनी संशयित आरोपीशेख सादिक शेख नासिर वय-३८ रा. भिस्तीवाडा जाम मोहल्ला भुसावळ याला भुसावळातून ताब्यात घेतले. त्याची अंग झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ३३ इंच लांबीची तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार हस्तगत करून पुढील कारवाईसाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Protected Content